Homeताज्या बातम्यानवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांच्या नावासाठी ८ जुलैला रस्ते चक्काजाम; रश्मीता ताईंच्या...

नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांच्या नावासाठी ८ जुलैला रस्ते चक्काजाम; रश्मीता ताईंच्या उपोषणाला आगरी सेनेचा पाठिंबा

नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आता भूमिपुत्र आरपारच्या लढ्याच्या तयारीत आहेत. याच मुख्य मागणीसाठी आणि भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी आमच्या धडाडीच्या भगिनी रश्मीता ताई या आमरण उपोषणाला बसल्या आहेत. प्रकृतीची पर्वा न करता, आपल्या समाजाच्या अस्मितेसाठी रश्मीता ताईंनी सुरू केलेल्या या आंदोलनाला आता संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे.

या संवेदनशील प्रसंगी आगरी सेना प्रमुख आदरणीय प्रदीपजी राजाराम साळवी साहेब यांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन रश्मीता ताईंच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. एवढंच नाही तर, विमानतळाला दिबांचं नाव लागेपर्यंत आगरी सेना शांत बसणार नाही, अशी भविष्यातील अत्यंत आक्रमक भूमिकाही साळवी साहेबांनी यावेळी स्पष्ट केली.

८ जुलैला रस्ते चक्काजाम होणारच! आंदोलकांनी सरकारला थेट इशारा दिला आहे की, ९४ गावांतील प्रकल्पबाधित, शेतकरी, कष्टकरी आणि आगरी-कोळी समाज ८ जुलैला मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील सर्व भूमिपुत्र एकत्र येणार असून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. “सरकारने कितीही गुन्हे दाखल केले किंवा दडपशाही केली, तरी आम्ही थांबणार नाही. रस्ते चक्काजाम झाल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही,” अशी संतप्त आणि ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. ही लढाई अस्मितेची असून दिबांचे नाव विमानतळाला लागल्याशिवाय आता भूमिपुत्र माघार घेणार नाहीत, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

इताडे गावात चोरीचा प्रयत्न आणि महिलेवर प्राणघातक हल्ला; सीसीटीव्ही-डीव्हीआर फोडत घरात तोडफोड

0
इताडे गावात चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या संशयिताने घरची तोडफोड करत सीसीटीव्ही आणि डीव्हीआर (CCTV-DVR) फोडल्याची आणि विरोध करणाऱ्या महिलेवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची...

इताडे गावात दिवसाढवळ्या घरफोडी; महिलेवर हल्ला करून रोख रक्कमेसह दागिने लांबवले

0
भिवंडी / इताडे : इताडे गावात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरफोडीची गंभीर घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घरातील पुरुष मंडळी कामावर गेल्याची...

इताडे ग्रामस्थांच्या सोयीसाठी उत्तम बुवा तिस्करांचा पुढाकार; ह.भ.प. भाऊ महाराज वेळेकरांच्या हस्ते नागरी सुविधांचा...

0
इताडे (भिवंडी): आपल्या भागातील समाजसेवक ह.भ.प. श्री. उत्तम तुकाराम तिस्कर यांच्या  विशेष पुढाकाराने इताडे गावामध्ये विविध सामाजिक व लोककल्याणकारी नागरी सुविधांचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

error: Content is protected !!