
वारकरी संप्रदाय आमणे लोनाड परिसर (ता. भिवंडी, जि. ठाणे) यांच्या वतीने आयोजित १८ व्या पायी पालखी सोहळ्याला मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली असून श्री क्षेत्र आमणे ते श्री क्षेत्र आळंदी देवाची असा हा सोहळा मार्गस्थ झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व भाविक आणि वारकऱ्यांसाठी ईताडे गावचे सरपंच ह.भ.प. श्री. जगन मधुकर पाटील यांच्या वतीने दररोज नाष्ट्याची सेवा दिली जात आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात वारकरी भजन करत अत्यंत आनंदाने व उत्साहाने श्री क्षेत्र आळंदी देवाचीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत.
नित्यम न्यूज — नेहमी सत्य, नेहमी तुमच्या सोबत | 🌐 https://nityamnews.in | 📞 जाहिरातीसाठी संपर्क: 8879125588
































