इताडे (भिवंडी):
आपल्या भागातील समाजसेवक ह.भ.प. श्री. उत्तम तुकाराम तिस्कर यांच्या विशेष पुढाकाराने इताडे गावामध्ये विविध सामाजिक व लोककल्याणकारी नागरी सुविधांचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात आणि भव्य वातावरणात पार पडला. ग्रामस्थांच्या सोयीचा विचार करून गणेशघाट तलाव परिसरात ३ नवीन आकर्षक बाकडे बसवण्यात आले असून, त्यांचे शुभउद्घाटन ह.भ.प. श्री. भाऊ महाराज वेळेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच नागरिकांना सावली व बैठकीची उत्तम सोय व्हावी यासाठी स्मशानभूमीत बसायच्या स्टँडसहित २ भव्य पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहेत.
या प्रसंगी बोलताना ह.भ.प. भाऊ महाराज वेळेकर यांनी उत्तम बुवा तिस्कर यांच्या सामाजिक बांधिलकीचे व दातृत्वाचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोहळ्यादरम्यान भाऊ महाराजांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला समाजसेवक श्री. दीपक मदन पाटील, श्री. रवींद्र पाटील, श्री. चंद्रकांत पाटील, श्री. रमेश पाटील, श्री. गंगाराम तिस्कर, आणि श्री. चैतन्य गुरुनाथ पाटील यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























