Monday, July 27, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याइताडे नगरीत वै. ह.भ.प. नरेश महाराज पाटील यांचा ५ वा पुण्यस्मरण सोहळा...

इताडे नगरीत वै. ह.भ.प. नरेश महाराज पाटील यांचा ५ वा पुण्यस्मरण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न; वारकरी संप्रदायातील दिग्गजांची उपस्थिती

इताडे नगरीत वै. ह.भ.प. नरेश महाराज पाटील यांचा ५ वा पुण्यस्मरण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

भिवंडी (प्रतिनिधी): प.पु. गुरुवर्य वै. ह.भ.प. केशव महाराज (बापूसाहेब) कबीर, आळंदी देवाची यांचे पट्टशिष्य वै. ह.भ.प. नरेश महाराज पाटील यांचा पाचवा पुण्यस्मरण सोहळा मंगळवार, दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी इताडे (भिवंडी) येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला. या निमित्ताने आयोजित धार्मिक कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळींसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.

ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर यांची रंगली कीर्तन सेवा सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात सायंकाळी ४:३० ते ६:३० या वेळेत गुरुवर्य ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर (विश्वस्त, श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज मंदिर समिती, आळंदी देवाची) यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न झाली. आपल्या रसाळ वाणीतून महाराजांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी वारकरी संप्रदाय आमने-लोणाड परिसराचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. जनार्दन महाराज पाटील, आगरिसेना उल्हासनगर तालुका अध्यक्ष मा. श्री. जितेंद्रजी जोशी साहेब आणि अष्टविनायक फाउंडेशनचे संस्थापक मा. श्री. नितीनजी कडू साहेब प्रामुख्याने उपस्थित होते. या मान्यवरांसह परिसरातील इतर वरिष्ठ मंडळींनी उपस्थित राहून वै. नरेश महाराजांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन केले.

भजन सेवेने वातावरण झाले विठ्ठलमय भक्तीचा जागर सुरू ठेवत रात्री ९ वाजता ‘जय गणेश प्रासादिक भजन मंडळ’ (कुलवंतनगर, शहापूर) यांच्या वतीने भजन सेवा सादर करण्यात आली. यामध्ये प्रसिद्ध गायक विठ्ठलबुवा वरकुटे व त्यांच्या संचाने पहाडी आवाजात भजने सादर केली. त्यांना धनंजय घरत यांनी पखवाजवर तर दर्शन पवार यांनी तबल्यावर उत्तम साथ दिली. या भजनांनी संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता.

भाविकांची मोठी उपस्थिती आणि महाप्रसाद या पुण्यस्मरण सोहळ्यासाठी इताडे गावातील आणि पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि मंगलमय वातावरणात हा सोहळा पार पडला.

वृत्त संकलन: नित्यम न्यूज, भिवंडी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि स्टायपेंडच्या प्रश्नांना झेंडा दाखवला, रोहित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले...

0
एनसीपी (एसपी) नेते रोहित पवार एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांसोबत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांनी रविवारी कॅम्पस भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या...

कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट, “जेव्हा तुम्ही एखाद्या योग्य व्यक्तीला पाहता, तेव्हा त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न...

0
कन्फ्यूशियसचे दिवसाचे कोट कन्फ्यूशियस हा इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी विचारवंतांपैकी एक आहे. त्याच्या शिकवणींनी चीन, कोरिया, जपान, व्हिएतनाम आणि आशियातील इतर अनेक...

‘माझे सलग तिसरे CWG सुवर्ण जिंकण्यासाठी नम्र आहे’: मीराबाई चानू ग्लासगोमध्ये भारताला पहिले सुवर्ण...

0
मीराबाई चानू (एएनआय फोटो) मीराबाई चानूने ग्लासगो 2026 येथे महिलांच्या 48 किलो वजनाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिचे सलग तिसरे सुवर्णपदक जिंकून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल | पुणे बातम्या

0
नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा | पुणे बातम्या

0
रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

error: Content is protected !!