ठाणे: ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने ‘मिशन भरारी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर आणि मुरबाड यांसारख्या ग्रामीण भागातील ५९ गुणवंत विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ (ISRO) सहलीसाठी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सहलीला हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या. हे सर्व विद्यार्थी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राला भेट देणार असून, तिथे त्यांना प्रत्यक्ष रॉकेट प्रक्षेपण आणि उपग्रह निर्मितीची प्रक्रिया जवळून अनुभवता येणार आहे. जिल्हा प्रशासनाचा हा उपक्रम ग्रामीण भागातील भविष्यातील शास्त्रज्ञ घडवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – सौ.स्नेहा गितेश पाटील



























