“भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाचे काम ७ वर्षांपासून रखडले; संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा”

20

भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाच्या दुरवस्थेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. गेल्या सात वर्षांपासून या महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक संघटनांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून लवकरच मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.