त्या विनवण्या करत राहिल्या.. पण बुलडोझरने सगळंच उद्ध्वस्त केलं! भिवंडीत महापालिकेची धडक कारवाई | Nityam News

27
Bhiwandi municipal corporation anti encroachment drive at Bhaji Market Prabhag Samiti 5 Nizampura by Nityam News feature image.
Bhiwandi municipal corporation anti encroachment drive at Bhaji Market Prabhag Samiti 5 Nizampura by Nityam News feature image.

भिवंडी: भिवंडी शहरातील प्रभाग समिती क्र. ५ अंतर्गत असलेल्या भाजी मार्केट परिसरात आज भिवंडी महापालिकेच्या वतीने अत्यंत मोठी आणि धडक अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली.

जुन्या निजामपुरा पोलीस ठाण्यासमोर आणि आजूबाजूच्या मुख्य रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी थाटलेल्या अनधिकृत दुकानांवर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने थेट जेसीबी (बुलडोझर) चालवला. या कारवाईदरम्यान काही महिला भाजी विक्रेत्या आपल्या उपजीविकेचे साधन वाचवण्यासाठी प्रशासनाला विनवण्या करत होत्या, मात्र मनपाने रस्त्यावरील सर्व दुकाने उद्ध्वस्त केली.

या कारवाईदरम्यान महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि स्थानिक दुकानदार-फेरीवाल्यांमध्ये काही काळासाठी प्रचंड वाद व गोंधळ निर्माण झाला होता. शेवटी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून हे संपूर्ण अतिक्रमण हटवण्यात आले. पहा हा ग्राउंड रिपोर्ट…

#BhiwandiNews #NityamNews #LokmatNews #BhiwandiMunicipalCorporation #AntiEncroachmentDrive #NizampuraPoliceStation #BhiwandiMarket #MarathiNews #BreakingNews

📢 नित्यम न्यूज (Nityam News) – भिवंडी व ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी चॅनेलला नक्की Subscribe करा! 📞 संपर्क/बातम्यांसाठी: 8879125588 📧 ईमेल: nityamgp@gmail.com 🌐 वेबसाईट: nityamnews.in