
भिवंडी/ठाणे: मुंबई-नाशिक महामार्गावरून (भिवंडी बायपास) प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. माजिवडा ते वडपे दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामांतर्गत, अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वडपे उड्डाणपुलाची नवीन ४ पदरी मार्गिका (Lane) अखेर वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
समृद्धी महामार्ग आणि नाशिकहून मुंबई-ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना वडपे नाक्यावर तासनतास ट्रॅफिकचा सामना करावा लागत होता. या नवीन लेनमुळे आता या भागातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर फुटण्यास मदत होणार आहे. रस्ता ८ पदरी करण्याच्या कामाला यामुळे गती मिळाली असून, स्थानिक नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – सौ.स्नेहा गितेश पाटील







