भिवंडीत उष्णतेची लाट; पिसे धरणाच्या थंड पाण्यात पोहण्यासाठी तरुणाईची गर्दी!

18

इतडेYइताडे/भिवंडी:

राज्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, तीव्र उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या वाढत्या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील मित्र मंडळींनी आपला मोर्चा जलसाठ्यांकडे वळवला आहे. भिवंडी तालुक्यातील पिसे धरण (भातसा नदी) परिसरात आज परिसरातील तरुणांनी एकत्र येत नदीच्या थंड पाण्यात पोहण्याचा मनमुराद आनंद लुटला.