नित्यम कोचिंग क्लासेस - इताडे मोरोलीपाडा येथील १ ली ते १० वी चे विशेष मार्गदर्शन केंद्र
नित्यम कोचिंग क्लासेस - इताडे मोरोलीपाडा येथील १ ली ते १० वी चे विशेष मार्गदर्शन केंद्र

इताडे (नित्यम न्यूज प्रतिनिधी): भिवंडी तालुक्यातील इताडे, आमणे, सावद,किरवली, सांगे, पिसे आणि नांदकर परिसरातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. इताडे (मोरोलीपाडा) येथे ‘नित्यम कोचिंग क्लासेस’चा शुभारंभ झाला असून, यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता उच्च दर्जाचे शिक्षण आपल्या घराच्या जवळच उपलब्ध झाले आहे.

शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवण्याच्या उद्देशाने स्नेहा गितेश पाटील यांनी या क्लासेसची सुरुवात केली आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विषयाची सखोल समज असणे आवश्यक आहे. हीच गरज ओळखून इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, सेमी-इंग्रजी आणि इंग्रजी अशा तिन्ही माध्यमातून येथे मार्गदर्शन केले जाणार आहे.

परिसरातील विद्यार्थ्यांसाठी खास आकर्षण:

  • आमणे, सावद ,किरवली आणि नांदकर  भागातील विद्यार्थ्यांना आता शहराकडे धाव घेण्याची गरज नाही; त्यांना जवळच दर्जेदार ‘होम ट्युशन’ स्टाईल मार्गदर्शन मिळेल.

  • प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर स्वतंत्र आणि वैयक्तिक लक्ष दिले जाणार आहे.

  • कठीण वाटणारे गणित आणि इंग्रजी यांसारखे विषय अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जातील.

  • विद्यार्थ्यांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी साप्ताहिक चाचण्या आणि नियमित सराव परीक्षा घेतल्या जातील.

विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करणे हेच आमचे मुख्य ध्येय असल्याचे स्नेहा पाटील यांनी सांगितले आहे. इताडे आणि परिसरातील पालकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क: 📍 पत्ता: माऊली निवास, मु. इताडे (मोरोलीपाडा), पो. आमणे, ता. भिवंडी. 📞 संपर्क क्रमांक: 9987044632.


नित्यम न्यूज – आपल्या हक्काचे बातमी पोर्टल.